धाराशिव / प्रतिनिधी-

तिन्ही राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए ने मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. नागालँडमध्ये शरद पवार यांच्या एनसीपीने न मागता बीजेपी सरकारला पाठींबा दिला. वास्तवीक एनसीपीने विरोधी पक्ष म्हणून तेथे राहणे आवश्यक होते. परंतू तसे न करता आवश्यकता नसताना एनसीपी  ने भाजपला सरकार बनविण्यासाठी पाठींबा दिला आहे. आपण व शरद पवार यांनी अनेक वर्ष एकत्र काम केले आहे.    त्यामुळे एनसीपीचे नेते शरद पवार यांनी एनडीए मध्ये यावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. 

रामदास आठवले यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी पँथर यशपाल सरवदे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्याच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी आठवले शुक्रवार दि. १० मार्च रोजी धाराशिवमध्ये आले हेाते. त्यानंतर त्यांनी दुपारी पत्रकार परिषदत घेतली. पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकार ने आत्तापर्यंत राबविण्यात आलेल्या अनेक योजनेची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. मोदी सरकार संविधान बदलणार, अशी एक अफवा विरोधक पसरवत आहेत. परंतू संविधान बदलने सोपे नाही, उलट त्याच संविधानानुसार मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे सरकार विषयी बोलताना शिंदे-फडणवीस सरकार आपला कार्यकाल पुर्ण करतील, असेही सांगितले. निवडणुक आयोगाने संख्याबळाचा विचार करून िशवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. निवडणुक आयोग भावनात्मक निर्णय घेऊ शकत नसतो, असा टोला ही आठवले नाही मारला.  याचवेळी आठवले यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकारणात कायम वैर कोणाचेच नसते, असे सांगितल्याचा दाखला दिला. यावेळी रिपाईचे राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ ओव्हाळ, बाबुराव कदम, रवी माळाळे आदी उपस्थित होते. 

उद्धव ठाकरे यांनी चुकीची किंमत मोजली

उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती असताना त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊन मुख्यमंत्री पद मिळवले. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी अंमलात आणले नाहीत त्यामुळे त्यांना पक्ष व चिन्ह सोडण्याची मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. देशात काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कधीच यश मिळू शकणार नाही,यावेळी ना. आठवले यांनी औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर व उस्मानाबादचे  नामांतर धाराशिव केल्याबद्दल त्यांना पाठींबा जाहीर करून आता विरोध करने चुकीचे आहे. असेही सांगितले. 

आयोध्देत बौध्द मंदिर बांधणे आवश्यक 

भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान चायना, तैवान, थायलंड, श्रीलंका आदी देशात बौध्द धर्म मोठ्या प्रमाणात होता. परंतू त्यानंतर शकराचार्यांनी हिंदु धर्माची स्थापना केली. आणि बौध्द मंदिराचे हिंदु मंदिरामध्ये परिवर्तन केले. त्यानंतर मोघल आले. त्यांनी मंदिराचे मस्जिदीमध्ये परिवर्तन केले. त्यामुळे आयोध्दयामध्ये खोदकाम करताना बौध्द स्तुप वगैरे सापडल्याचे त्यांनी मान्य करून आयोध्दयात मोठे बौध्द मंदिर बाधणे आवश्यक असल्यचे सांगितले. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी प्रकाश आंबेडकरांना कांही कळत नाही, त्यामुळेच ते एनडीए मध्ये येत नसल्याचे सांगितले. 

 
Top