धाराशिव /प्रतिनिधी 

     दि.महाराष्ट्र स्टेट को-मार्केंटिंग लि. धाराशिव व धाराशिव तालुका खरेदी-विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या आधारभूत किंमतीने हरभरा खरेदीचा शुभारंभ मा.नितिन काळे  भा.ज.पा जिल्हाध्यक्ष यांच्या शुभहस्ते काटा पूजन करुन करण्यात आला.यावेळी फेडरेशनचे प्रमुख भोसले साहेब,भाजपाचे जेष्ठ नेते सतिश देशमुख,संघाचे चेरमन -अनंतराव देशमुख,माजी चेरमन तथा जेष्ठ संचालक  उद्धवराव पाटील,संचालक भुजंगराव पाटील,दिनेश देशमुख,हरिश्चंद्र डोलारे,बाजार समितीचे सभापती दत्ताञय देशमुख,माजी सभापती निहाल काझी,माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार माळी,बाजार समिती माजी संचालक लिंबराज साळुंके,श्रावण आदटराव,झुंबर घोडके,तिवारी भाऊ ढोकी,प्रभाकर गाढवे व असंख्य हरभरा उत्पादक शेतकरी हजर होते.

  यावेळी अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांचा संघाच्यावतीने चेरमन,संचालक व कर्मचार्यांच्या हस्ते यथोच्चीत सत्कार करण्यात आला. काटा पूजनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे व्यवस्थापक दिपक शेलार,दिपक मुंढे,वसंत जाधव,व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.   प्रास्तविक संचालक दिनेश देशमुख यानी केले तर आभार व्यवस्थापक दिपक शेलार मानले.

 
Top