धाराशिव / प्रतिनिधी-

 एका ठेकेदार कंपनीला ग्रामपंचायतमधील काम सुरु करू देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागून 1 लाख रुपये लाच घेताना घेताना एका सरपंच पतीस धाराशिव लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केली आहे.

 परंडा तालुक्यातील रोहकल या ग्रामपंचायतमधील कामे सुरु करू देण्यासाठी ही लाच घेतली आहे. रोहकल येथील सरपंच पती हनुमंत पांडुरंग कोलते यांना 1 लाखांची लाच घेताना अटक केली आहे.   रोहकल गावातील तीन जलजीवन योजनेच्या साईडचे प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 50 हजार रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य द्या अशी लाच मागितली व 1 लाख रुपये घेताना अटक केली आहे.     

 पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांनी मार्गदर्शन केले. सापळा पथकात पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, इफ्तेकार शेख, सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर यांनी काम पहिले.

 
Top