उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये कै. के.टी. पाटील सर (बप्पा ) स्मारक समिती बैठक संपन्न झाली .

        आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  सुधीर अण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली कै . के .टी .पाटील सर यांचे जयंतीदिनी ११ सप्टेंबर  रोजी पुतळा अनावरण समारंभ संपन्न होणार आहे त्यानिमित्ताने भव्य स्मारक नियोजित आहे व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संकुलातील सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे सदरील बैठकीमध्ये स्मारक  समितीच्या अध्यक्षपदी  फुलचंद गाडे यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी  श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य  साहेबराव देशमुख, सचिव संतोष कुलकर्णी ,सदस्या सौ .प्रेमाताई  सुधीर पाटील , सदस्य डॉ . हर्षल डंबल, राजेंद्र जाधव,  मनोज भुसे अशा सात मुख्य समिती नियुक्ती करण्यात आली आहे . सदरील समितीची नोंदणी  धर्मादाय आयुक्त जिल्हा कार्यालय उस्मानाबाद येथे झालेली असून रजिस्टर क्रमांक E-0000639(OSM) असल्याचे सांगण्यात आले . कै . के . टी. पाटील सर स्मारक समितीच्या नियंत्रणाखाली आजी माजी आमदार, अन्य संख्या चालक , शहरातील व्यापारी नामांकित संख्येचे आजी माजी संचालक, समाजातील मान्यवर व्यक्ती , माजी शिक्षक , माजी विद्यार्थी संस्थेतील प्राचार्य विभाग प्रमुख ,४४ सदस्यांची उपसमिती नेमणूक करण्यात आली . प्रास्ताविक स्मारक समिती समन्वयक डॉ. अजित मसलेकर यांनी नियोजन रुपरेषा सांगितली सदरील बैठकीमध्ये स्मारकाचा आढावा घेण्यात आला व पुढील दिशा ठरवण्यात आली . या बैठकीला  संस्थाध्यक्ष सुधीर अण्णा पाटील यांनी मार्गदर्शन केले स्मारकाचे प्राथमिक संकल्प रेखाचित्र भोसले हायस्कूलचे कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी केले असून ९ फुटी पुर्णाकृती पुतळ्याचे काम कोल्हापूर येथील नामांकित शिल्पकार प्रभाकर डोंगरसाने आर्ट स्टुडिओ यांना देण्यात आले असुन उठावशिल्प जीवनपट जयसिंगपूर येथील नामांकित उठावशिल्पकार आप्पासो घाटगे यांच्या देण्यात येणार असून संस्था इतिहास संग्रहालय सुद्धा याच स्माकाराच्या ठिकाणी होईल . या प्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील सर्व संस्था सदस्य व स्मारक समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते सुत्रसंचालन व आभार स्मारक सदस्य राजेंद्र जाधव यांनी मानले.


 
Top