तुळजापूर / प्रतिनिधी-

   तालुक्यातील अनेक रेशनदुकानदारांना  गोदामातुन फाटक्या  बारदान्यातुन  निकृष्ट दर्जाचा  अन्नधान्य माल  वाटप होत असल्याने फाटक्या बारदानातुन माल गळुन जात याचा फटका रेशनदुकानदारांना बसत आहे हा प्रकार म्हणजे  मापात पाप असा असल्याचा आरोप होत  आहे. 

दर्जदार माल कार्डधारकांना मिळत नसल्याने कार्डधारक  व रेशनदुकानदारांन मध्ये शाब्दीक चकमकी घडत आहेत.त्यामुळे चांगल्या बारदान्यात व खाण्यायोग्य दर्जाचा माल वितरीत करण्याची मागणी होत आहे. तुळजापूर तालुक्यात १९२रेशनदुकानदार असुन गोडावुन मधुन रेशनदुकानदारांना सध्या फाटक्या बारदानातुन   माल वितरण केला जात आहे 

यात फाटक्या बारदान्यात माल वितरण होत असल्याने  माल गळाल्या मुळे  कमी येवुन रेशन दुकानदारांना याचा अर्थिक रुपात  फटका बसत आहे. तुळजापूर तहसिल मधील पुरवाठा  विभागाने यात लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.

 
Top