उमरगा/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील मुरूम येथील महेंद्र भीमराव कांबळे यांची तालुका विधी सेवा समितीवर विधी स्वयंसेवक म्हणून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के.अनभुले यांनी निवड केली आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांच्या कडून पॅरालिगल व्हॉलिंटर्स पदा करिता नुकतेच अर्ज मागविण्यात आले होते.त्यानंतर (दि.१२) जानेवारी रोजी सदर उमेदवारांची जिल्हा न्यायाधीशांनी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन ही निवड केली असून एक फेब्रुवारी रोजी नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. या निवडी बद्धल उस्मानाबाद जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले,आमदार ज्ञानराज चौगुले,प्राचार्य सविता मुरूमकर,भाजपाचे तालुका अध्यक्ष कैलास शिंदे, माजी नगरसेवक दत्ता रोंगे, प्रा अण्णाराव कांबळे, डॉ आंबेडकर एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष मसाजी कांबळे, सचिव निर्मलकुमार लिमये,शंकर कांबळे,जी. एल. कांबळे, संतोष कांबळे,आदींनी महेंद्र कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.

 

 
Top