उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

 थोर समाजसुधारक राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांच्या वतीने संत गाडगेबाबा चौकातील संत गाडगेबाबा स्मारक येथे सामुदायिक अभिवादन करण्यात आले.राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला सुरेखा ताई काशिद व सौ राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.संत गाडगेबाबा यांच्या सहीत इतरही महापुरुषांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.संत गाडगेबाबा यांच्या दशसुत्रीचे सामुदायिक वाचन करण्यात आले.त्यांनी केलेल्या कार्याची माहिती मान्यवरांनी आपापल्या मनोगतातुन व्यक्त केली.अभिवादन करतांना सुरेखा ताई काशिद,सौ.राऊत,नेताजी धोंगडे,रवि कोरे आळणीकर,नवनाथ राऊत,सिध्दार्थ बनसोडे,पृथ्वीराज चिलवंत,नाना घाडगे,महादेव माळी,राजाभाऊ पवार,बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,राजेंद्र धावारे,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,नामदेव वाघमारे,सुदेश माळाळे,अॅड.माढेकर,वसंत राऊत,महेश धोंगडे,नितीन धोंगडे,श्री काटकर,श्रीकांत चिलवंत,सचिन दिलपाक,स्वराज जानराव,अंकुश पेठे,अनंत वाघमारे,अन्य इतर उपस्थित होते.


 
Top