उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मकर संक्रांतीचे औचित्य साधत लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या वतीने तामलवाडी ता.तुळजापूर येथे हळदी -कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमांसाठी गावातील महिलांचा उदंड प्रतिसाद पाहिला मिळाला. यावेळी महिलांशी हितगुज करताना महिलांना येणाऱ्या आडचणी, महिला सक्षमीकरण, बचतगटाचे महत्त्व, पशुपालन, शेळीपालन, या व्यवसासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, प्रशिक्षणे व अर्थ साह्य या विविध विषयावर माहिती दिली. तामलवाडी भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन दिले. कार्यक्रमास आलेल्या महिलांना नवीन वर्षाची दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली. यावेळी महिला बचत गट, सी.आर.पी. आशा कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला.

 या कार्यक्रमात तामलवाडी परिसरातील गावामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील नवनियुक्त महिला सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये गंजेवाडी, सांगवी (काटी), सावरगाव, धोत्री आदी गावातील विजयी झालेल्या महिलांचा समावेश होता. याप्रसंगी बोलताना सौ.अर्चनाताई पाटील यांनी सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच राजकारणात महिलांनी यावे असे आवाहन केले.  

 कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी जि.प.अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे, महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्या मनीषाताई केंद्रे, सौ.सुषमाताई लोंढे, सौ.प्रियांकाताई लोंढे, सौ.रेश्माताई माळी, सावरगावच्या सरपंच सौ.सुवर्णाताई राजकुमार पाटील, तामलवाडीच्या सरपंच सौ.मंगलताई गवळी, सौ.ज्ञानेश्वरी शिंदे यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी श्री.यशवंत अण्णा लोंढे, श्री.शहाजी लोंढे, श्री.दत्तात्रय वडणे, श्री.विजय देवकर, श्री.सुधाकर लोंढे, श्री.विठ्ठल नरवडे, प्राचार्य श्री.सुहास वडणे, श्री.रामलिंग सगर, श्री.ज्ञानेश्वरी माळी, श्री.इंद्रजित गोटकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व महिला-भगिनींची मोठी उपस्थिती होती.


 
Top