उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून विकासात्मक व संघटनात्मक बळकटीकरणाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसभा प्रवास योजना राबविण्यात येत असून उस्मानाबाद  लोकसभा मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय गृह राज्यमंत्री .अजय कुमार मिश्रा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दि.04 व 05 जानेवारी त्यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा निश्चित करण्यात आला आहे. सदरील दौऱ्यामध्ये लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते, योजनांचे लाभार्थी यांच्याशी संवाद साधण्यात येणार असून प्रेरणा स्थळांना भेट देण्यात येणार आहे.

 या दौऱ्यासाठी या लोकसभेचे पालक माजी मंत्री आ. विजयजुमार देशमुख, प्रवास संयोजक माजी मंत्री बाळा भेगडे, मराठवाडा संघटमंत्री संजय कौडगे, लोकसभा संयोजक आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आ. सुजितसिंह ठाकूर, आ. राजेंद्र राऊत, आ. अभिमन्यू पवार, लातूर जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्यांशेट्टी हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितिन काळे यांनी दिली आहे.


 
Top