उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ( दि.१३) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय उस्मानाबाद येथे आढावा बैठक पार पडली.

 यावेळी हिरालाल राठोड यांनी भटक्या विमुक्त जाती सेलचे महत्व पटवून देताना आपल्या हक्काची जाणीव करून देत हक्क मिळवण्यासाठी या सेल मार्फत आपण कसे लढू शकतो याबाबत सविस्तर माहिती सांगितली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांनीही मार्गदर्शन केले.

 तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उस्मानाबाद  भटक्या विमुक्त जाती सेल च्या जिल्हाध्यक्ष पदी सुनील मधुकरराव शेंडगे  व जिल्हाकार्याध्यक्ष पदी राजेंद्र विठ्ठलराव गायकवाड यांना भटक्या विमुक्त जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड  यांनी  ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत  पदाचे पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली.

 या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हा बँकेचे संचालक संजीव पाटील, शहराध्यक्ष अयाझ शेख, कळंब उस्मानाबाद विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, तालुका उपाध्यक्ष बालाजी शिंदे, संदीप गंगणे, पृथ्वीराज आंधळे यांच्यासह  सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते,  विशेषतः भटक्या विमुक्त जाती सेलचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top