उस्मानाबाद / प्रतिनिधी-

एम सी ए पुणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार्या निमंत्रित आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धे करिता उस्मानाबाद जिल्हा सिनियर क्रिकेट संघाची निवड चाचणी दि.22 जानेवारी 2023 रोजी तुळजाभवानी स्टेडियमवर सकाळी ठिक 11 वाजता होणार आहे.

तरी उस्मानाबाद जिल्हातीलच खेळाडूंना या चाचणीत भाग घेता येईल‌.खेळाडूंनी निवड चाचणीच्या वेळी गावचे गावचे रहिवासी प्रमाणपत्र व आधारकार्ड प्रमाणात असने बंधनकारक आहे.आधार कार्ड व रहिवासी प्रमाणपत्र नसल्यास निवड चाचणीमध्ये भाग घेता येणार नाही.निवड चाचणी प्रवेश फिस रू.500/- व क्रिकेट किटसह वरील तारखेस हजर रहावे असे जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विजय दंडनाईक, सचिव दत्ता बंडगर यांनी कळवले आहे.


 
Top