तुळजापुर / प्रतिनिधी-

  तिर्थक्षेञ तुळजापूर येथील  मज्जीद व मदरशा वरील असलेले भोंगे काढावेत अन्यथा भक्ती गीते  लावण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवबाराजे प्रतिष्ठानने तहसिलदार यांना निवेदन देवुन केली. 

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,  तिर्थक्षेञ  तुळजापूर येथे मज्जीद व मदरशावर अनाधिकृत भोंगा  बसवुन मोठा आवाज  सोडला जात आहे.  शुक्रवार पेठ जिजामाता नगर येथे असलेल्या मदरशावरील भोंग्याचा आवाज  तुळजाभवानी मंदिरापर्यंत ऐकावयास येत आहे. सदरील आवाजाचा त्रास येथील रहीवाशांना होत  आहे.  याबाबत योग्य उपाययोजना करुन तुळजापूर येथील मज्जीद वरील भोंगे तात्काळ काढावे, अन्यथा आम्हास आमच्या घरावर भोंगा लावुन भक्तीगीते लावण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती शिवबाराजे प्रतिष्ठाण  तुळजापूर, यांच्या वतीने करण्यात आली. तसेच  भोंगे नाही काढल्यास  आमच्या घरावर भोंगे लावु व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील  याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटलं आहे .  हे निवेदन महंत मावजीनाथ, महंत व्यकंटअरण्य महाराज  यांच्या  नेतृत्वाखाली  अर्जून सांळुके,  विकास वाघमारे, नितीन जट्टे,  दिनेश कापसे, विनायक माळी, दिपक निकम, गणेश भुजबळ,  सागर इंगळे, दिनेश रसाळ यांनी दिले. 

 
Top