उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तीक शेततळे योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्हयासाठी 390 शेततळयांचा लक्षांक प्राप्त आहे. शेततळयासाठी आकारमान निहाय रक्कम रुपये 14 हजार 433/- ते 75 हजार  पर्यन्त अनुदान देय आहे.

 योजनेचा लाभ घेणेकरीता पुढील प्रमाणे कार्यपध्दती आहे.

 लाभार्थी पात्रता निकष- अर्जदार शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र आवश्यक, शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिक दुष्टया योग्य असावी, अर्जदाराने यापुर्वी शासकिय योजनेतून शेततळे या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.

 आवश्यक कागदपत्रे- जमीनीचा 7/12 व 8 अ उतारा,आधारकार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, हमी पत्र, जातीचा दाखला

 लाभार्थी निवड- इच्छुक लाभार्थींनी महाडीबीटी पोर्टवरती (https://mahadbtmahit.gov.in ) या संकेतस्थळावर वैयक्तीक शेततळे या घटकांसाठी वैयक्तीक लाभार्थी म्हणून अर्ज करावा,महाडिबीटी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त अर्जातुन संगणकीय प्रणालीव्दारे सोडतीने निवड करण्यात येईल,

   तरी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत लाभ घेणेकरीता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक  माहितीसाठी कृषि सहाय्यक व तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क करावा.


 
Top