उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  शेळी बाजार मैदान, कळंब येथील- तोळाबाई शंकर पवार आणि इटकुर, ता. कळंब येथील  जयश्री गोरख शिंदे यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारी व्यक्ती, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याचा अधिनियम 1981 (MPDA) कलम- 3 (2) चे उल्लंघन केल्याने  पोलीस अधीक्षक  . अतुल कुलकर्णी यांनी त्या दोघींना स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव  जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास   जिल्हाधिकारी यांची मंजूरी मिळल्याने मा. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि  यशवंत जाधव, पोउपनि  संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, बबन जाधवर, शैला टेळे, महेबुब अरब यांच्या पथकाने  उपरोक्त दोन्ही महिलांना त्यांच्या राहत्या परिसरातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव कळंब पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.


 
Top