तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्रीतुळजाभवानी मातेच्या शांकंभरी नवराञोत्सतील दुसऱ्या माळेदिनी शनिवारी  देवीदर्नशनार्थ भाविकांनी गर्दी केली होती.आज देविजीस अभिषेक पुजा करण्यात आल्यानंतर वस्ञोलंकार घालण्यात येवुन नित्योपचार पुजा करण्यात आली नंतर शाकंभरी देवि प्रतिमा पुजन व घटपुजन करण्यात आले.

शाकंभरी नवराञोत्सवाचा प्रथम दिनी राञी सिंह वाहनावर देविजींचा छबिना काढण्यात आला होता.सरत्या 2022वर्षाला निरोप देत नव्या2023 वर्षाचे स्वागत करणे हा कालावधी श्रीतुळजाभवानी मातेच्या शांकंभरी नवराञोत्सवात आल्याने यंदा सरत्या वर्षाला निरोप देण्याचा उत्साहावर काहीसे   विरजन,पडले असले तरी  नव्या वर्षचा स्वागतासाठी माञ भाविक शनिवार ३१डिसेंबर 2022रोजी सांयकाळी मोठ्या संखेने दाखल झाले आहेत. त्यामुळे २०२३या नव्या वर्षी    रविवारी तिर्थक्षेञी भाविकांची मंदीयाळी असणार आहे.

नव्या वर्षाचे स्वागत दैवदर्शन करुन नवा संकल्प  करण्याची अनेकांची परंपरा असतेरात्यानुसार शनिवार भाविक मोठ्या संखेने तुळजापूरात दाखल झाले असुन यामुळे लाँजेस धर्मशाळा फुल्ल झाले असुन रविवारी ची अभिषेक पुजा बुकींग तीन दिवसापुर्वीच फुल्ल झाली आहे. ३१डिसेंबर शनिवारी आल्याने सेलिब्रेशन सरत्या वर्षाला निरोप उत्साहात देण्यावर मर्यादा आल्या  आहेत  ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशन बहुतांशी  शहरवासियांनी   मांसाहारी मंडळींनी थींफर्स्टचा आनंद शुक्रवारीच घेतल्याचे दिसुन आले.

 
Top