उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तेरणेचा न्यायालयीन वाद थांबवा अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा आम आदमी पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. अजित खोत यांनी २१शुगरला निवदेनाद्वारे दिला आहे. 

  या संदर्भात २१ शुगर, लातूर येथील चेअरमन तथा व्हाईस चेअरमन यांना देण्यात आलेले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. ढोकी हा गेल्या १२ वर्षापासून बंद असून हजारो कामगार बेरोजगार झाले असून ऊस उत्पादक सभासदांचा ऊसाच्या गाळपाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर ३५० ते ४०० कोटी रुपयांचे बँकेचे कर्ज असून सदर कर्जास नियमितच्या व्याजामुळे कर्जाचा व व्याजाचा आकडा वाढत आहे.  तेरणा कारखाना सुरु होईल अशी आशा लावून बसलेल्या सभासदांना न्यायालयीन प्रक्रीयेमध्ये कारखान्याचा वाद अडकल्यास सर्वसामान्य सभासदाला मोठा धक्का पोहचत आहे. सद्यपरिस्थितीमध्ये डी.आर.ए.टी. कोर्टाने तेरणा कारखाना भैरवनाथ शुगरला देणेबाबत झाल्याचा निर्णय योग्य ठरविला असून यापुढे २१शुगरने या निर्णयास मा.उच्च न्यायालयात आव्हान दिले तर सर्वसामान्य शेतकरी सभासदांना सामुहीक आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.   शेतकरी सभासदांचा हित लक्षात घेऊन न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य करावा. तेरणा कारखान्याचे प्रकरण न्यायालयामध्ये दाखल न करता तेरणा कारखाना सुरु होणेकामी आम्हा सभासदांना सहकार्य  अशी मागणी करण्यात आली आहे. 

निवेदनावर आम आदमी पाटीचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. अजित खोत, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे, अभिमान कोळी, भिमा विधाते, अमर लोमटे, सौदागर कावळे, संजय दनाने, हनमंत गडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top