तुळजापुर  / प्रतिनिधी-

 तुळजापुर तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या समर्थ नागरी सहकारी‎ पतसंस्थेच्या वतीनं कर्जदार सभासदांना अपघाती विम्याचे संरक्षण दिले जाते दुर्दैवानं एखाद्या कर्जदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसास अपघात विम्याची रक्कम दिले जाते याच योजनेतून संस्थेचे मृत सभासद अनिल साधू नवगिरे यांच्या पत्नीस पाच लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द‎ करण्यात आला. 

त्यामुळे या कुटुंबास आधार मिळाला आहे.‎ बारुळ येथील अनिल साधू नवगिरे हे आपल्या शेतात काम करत असताना  24 नोव्हेंबर 2021 रोजी सर्पदंश होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. ही‎ महिती कळताच पंतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी विमा कंपनीकडे कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करून मयताच्या‎ वारसदार पत्नी चंद्रकला अनिल नवगिरे  यांना पाच लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयांचा विमा मंजुर करुन घेतला. या विम्याच्या‎ रक्कमेचा धनादेश 26 डिसेंबर रोजी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण नन्नवरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला यावेळी संस्थेचे व्हा चेअरमन श्रीकांत भोजने सचिव सज्जन जाधव कर्ज विभाग प्रमुख सचिन शिंदे ॲड वैजिनाथ नवगिरे यांच्यासह सभासद कर्मचारी उपस्थित होते.


 
Top