उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जगात भारताचा  तोंडाचा कर्करोग होण्यामध्ये पहिला क्रमांक आहे.   परंतू योग्य उपचारा अभावी अनेकांचा मृत्यू होतो. कर्करोग  पेशींचे प्रसारण नेमके कोठे होते. हे शोधण्यासाठी जगात अमेरीकेमध्ये २००४ पासून रक्त चाचणीद्वारे  पेशीं शोधण्याची सुविधा सव्वा लाखा रुपयांमध्ये उपलब्ध होती. भारतात २०२२ पासून पुण्यात रक्तचाचणीद्वारे पेशंी शोधण्याची सुविधा १५ हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे.,अशी माहिती संशोधक  डॉ.जयंत खंदारे यांनी हॉटेल अॅपल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

विशेष म्हणजे अमेरीकेमध्ये या रक्तचाचणीचा अहवाल येण्यास १० दिवस लागतात. तर आपल्या भारतामधील या चाचणीद्वारे येणारा अहवाल ४८ तासात उपलब्ध होतो.  कर्करोगबाधित रुग्णांच्या रक्तातून सरक्युलेटिंग ट्यूमर सेल्सला   टिपणारी 24 ऑन्कोडीक्सव्हर हि रक्तचाचणी डॉ जयंत खंदारे यांनी विकसित केली आहे. भारतातील अश्या प्रकारची रक्तचाचणी हि पहिली व एकमेव चाचणी आहे. यामुळे अचूकपणे कार्यक्षम पद्धतीने आणि अत्यंत कमी वेळेत हि चाचणी करता येणार आहे गेली पंधरा वर्ष हे संशोधन कार्य पुणे आणि मुंबईमध्ये करण्यात आले या संशोधनात कार्यासाठी मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलची भूमिका ही महत्त्वाची ठरली आहे.  डॉ. खंदारे यांनी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून पीएचडी पूर्ण केली असून अमेरिकेतून तीन पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप आणि जर्मनीतील अॅलेक्झांडर वॉन हम्बोल्ड एक्सपिरियन्स्ड   फैलो आहे. मी २१ पेटट अॅप्लिकेशन सादर केली असून समाजातील अपूर्ण गरजांसाठी असलेल्या तीन तंत्रज्ञानाचे हस्तांतरण केले आहे शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकाशनांमध्ये डॉ. खंदारे यांचे प्रबंध प्रकाशित झाले आहेत.

कर्करोगाच्या पेशी रक्तातून वेगळ्या करणे शक्य

 आज भारतामध्ये ५०-६० लाख कर्करोगाचे रुग्ण भारतात आहेत. कॅन्स सेल फिल्टरेशन तंत्रज्ञान यावर आधारीत एका उपकरणाद्वारे रुग्णाच्या रक्तातून कर्करोगाच्या पेशी वेगळ्या करणे शक्य होते. कर्करोगाच्या पेशी (१० ते ३० मायक्रॉन आकाराच्या या परिधीय रक्तामधून प्राथमिक अवयवातून दूरच्या अवयवाकडे स्थलांतरित होतात व त्याद्वारे कर्करोगाचा प्रसार (कॅन्सर मेटासिस) होतो कर्करोगाने बाधीत लोकांपैकी ९० टक्के रुग्ण हे कॅन्सर मेटासिसचे निदान लवकर न झाल्यामुळे मृत्युमुखी पडतात कॅन्सर मेटासिसचे निदान होण्याची मर्यादा कमी असल्यामुळे पेट किंवा एमआरआय (सुमारे ८ ते १० मीलिमीटररा चाचणीमध्ये अशा पेशींचे अस्थित्वच लक्षात येत नाही व कर्करोगाचा प्रसार शरीरात जलदगतीने होत राहतो अन्कोडिस्कव्हर टेस्ट ही फर्स्ट इन क्लास लिक्विड बायोप्सी तंत्रज्ञानाधारित चाचणी असून त्याच्या यशस्वी वैदयकीय चाचण्या मुंबईतील टाटा मेमोरियल हास्पिटल  येथे झाल्या आहेत नव्याने आलेल्या मेडिकल डिव्हाइसेस कल्स २०१७ अंतर्गत इग्ज कंट्रोलर जनरल अॅऑफ इंडिया   या संस्थेने उत्पादन आणि विपणनासाठी मान्यता दिलेले भारतातील हे प्रथम आणि एकमेव स्वदेशी वैदयकीय उपकरण आहे एफडीए महाराष्ट्र यानी या कार्यासाठी भरीव मदत केली आहे.

 केंद्र सरकारकडून  गौरव 

श्री डॉ हर्षवर्धन माजी केंद्रीय आरोग्य मंत्री यानी ही चाचणी भारतामध्ये लाँच केली होती. तर केंद्र सरकारमधील वाणीज्य मंत्री श्री पियुष गोयल यांनी आम्हाला २०१९ मध्ये बेस्ट इनोव्हेटर इन हेल्थकेअर पुरस्काराने सन्मानित केले होते युरोप व अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये कर्करोगाच्या रुग्णांमध्ये स्क्रिनिंग आणि मॉनिटरिंगवर खूप मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येतो त्यामुळे तेथे कर्करोगाच्या केसेसचे प्रमाण सर्वाधिक असले तरी रुग्ण दगावण्याचे प्रमाण फक्त ३० टक्के आहे व तेच प्रमाण भारतात ६० टक्के एवढे जास्त आहे. त्यामुळे भारतात परवडणाऱ्या दरात ककरोगाशी संबंधित आरोग्यसेवा देण्यासाठीचे महत्त्वाचे मानक म्हणून परवडणाऱ्या दरातील प्राथमिक टप्प्यातच रोगनिदान करणाऱ्या चाचण्यांकडे पाहायला हवे एआयआरने अशी एक चाचणी विकसित केली असून त्याद्वारे महाराष्ट्र व भारतामध्ये परिणामकारक व परवडणाऱ्या दरात कर्करोगाशी संबंधित उपचार पुरवता येतील.या पत्रकार परिषदेत शिशिकांत कांबळे यांची ही उपस्थिती होती. 

 
Top