परंडा / प्रतिनिधी -

परंडा तालुक्यातील रोहकल ,पिस्तमवाडी येथे स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था व युरोपियन युनियन यांच्या वतीने दि . १५ रोजी गोट हेल्थ कॅम्प आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमात पिस्तमवाडी , रोहकल येथील शेळी उत्पादक गटातील महिलाच्या  शेळ्यांची तपासणी पशु चिकित्सिक डॉ.आर.ए.जगदाळे यांनी केली. 

यावेळी डॉ.जगदाळे यांनी पिस्तमवाडी येथे आजारी शेळ्यांची तपासणी करून उपचार केले . लसीकरण , डिवर्मीग , चारा व्यवस्थापन , गोठा व्यवस्थापन , चारा स्टॅन्ड , पाणी स्टॅन्ड या विषयी मार्गदर्शन केले . डिवर्मींगचे फायदे , केस गळती , वजन वाढवणे , शेळ्याला चमक येणे , गाभण शेळीची निगा , हिवाळ्यात शेळ्याची निगा कशी ठेवावी या विषयी सी.एल. एम . अजय हराळे यांनी मार्गदर्शन केले . या हेल्थ कॅम्पचे आयोजन स्वयंम - शिक्षण प्रयोग संस्थेचे संचालक उपमन्यु पाटील , जिल्हा समन्वयक किरण माने , प्रकल्प समन्वयक योगेश देशमुख , सीमा सय्यद यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले होते . कार्यक्रमास स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या  परंडा तालुका समन्वयक नौशाद शेख , गट समन्वयक अन्नपुर्णा ठोसर , लिडर - चंद्रकला चव्हाण यांच्यासह शेळी उत्पादक गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top