वाशी/ प्रतिनिधी-

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी,उस्मानाबाद द्वारा आयोजित दि.०३ डिसेंबर२०२२ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी च्या क्रीडास्पर्धकांनी उत्तुंग यश प्राप्त केले.महाविद्यालयाचे  कनिष्ठ विभागातील मोटे प्रतिक गोकुळ याने ८९किलो गटात ९०किलो वजन उचलून व येडे श्रीराम बाळासाहेब ६१ किलो गटात ८९किलो वजन उचलून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला. 

 मोटे प्रतीक गोकुळ याची नांदेड येथे दि.५ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. विभाग स्तरांमधे  मोटे प्रतीक गोकुळ  याने ८९ किलो गटात लातूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला व त्याची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत निवड झाली.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र कठारे, क्रीडा शिक्षक शशिकांत सरवदे,सर्व प्राध्यापक यांनी वेटलिफ्टिंग खेळाडूंचे कौतुक केले व होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top