उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अभ्यासाच्या बळावर भारताचे संविधान लिहितांना त्यांनी दलित,पददलित माणसांना माणूसपण मिळावे ते प्रवाहात यावे  यासाठी घटनेत आरक्षणाची तरतुद केली आणि भारत देशातील पिढ्यान—पिढ्या गुलामित जगलेल्या माणसांना स्वाभिमान दिला,हक्क दिलेआणि विज्ञानवादी बुध्द धम्म दिला त्यामुळेच आज अनुसुचित जातीतील माणसांचा विकास झाला आहे,होत आहे. संविधाना अगोदर दलितांची अवस्था काय होती?आणि आज त्यांच्यात झालेला बदल समोरच आहे असे प्रतिपादन प्रमुख पुहुणे म्हणून बोलताना  प्रा.राजा जगताप(मराठी विभाग,आर.पी.काॅलेज)यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,सहाय्यक आयुक्त समाजकल्याण उस्मानाबाद यांनी “सामाजिक न्याय पर्व”उपक्रमातील दि.३०नोव्हेंबर रोजी समाजकल्याण विभागातील कर्मचारी यांचेसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत “अनु.जाती उत्थान दशा व दिशा “ या व्याख्यानाच्या विषयावर केले आहे.

अध्यक्षस्थानी मा.बलभीम शिंदे(उपायुक्त उस्मानाबाद जिल्हा जात पडताळणी) हे होते यावेळी  बी.जी.अरवत(सहाय्यक आयुक्त समाजकल्याण उस्मानाबाद)हे उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे  व माण्यवरांनी छञपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,म.फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांचे पुजन केले.  अध्यक्षीय समारोप करताना मा.बलभीम शिंदे म्हणाले की,या विभागातील सर्व कर्मचारी यांनी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडावे व कुठल्याही अमिषाला बळी पडू नये नोकरी म्हटले की जबाबदारी येते ती व्यवस्थित पार पाडलीच पाहिजे. सूञसंचालन वाय.एस.चव्हाण यांनी केले आभार शिरसाट बी.डी.यांनी मानले.


 
Top