तुळजापूर  / प्रतिनिधी-

 येथील वीर तपस्वी मठामध्ये शुक्रवार, 2 डिसेंबर रोजी मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून व्याख्यान ही होणार आहे.  तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारातून प्रभा आयुर्वेद रथ यात्रेचा शुभारंभ तुळजापूर तहसीलदार, पोलीस निरीक्षक तुळजापूर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती वैद्य ऋतुराज कदम - पाटील व वैद्य गजानन कुलकर्णी यांनी दिली आहे.  

प्रभा फाऊंडेशनच्या वतीने राज्यातील 35 जिह्यात आयुर्वेद प्रचार व प्रसार करण्यासाठी रथयात्रा काढली जात आहे. या रथयात्रेचा शुभारंभ शुक्रवार, 2 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारातून तहसीलदार योगिता कोल्हे मॅडम, पोलीस निरीक्षक काशिद यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी रथयात्रेचे समन्वयक वैद्य दतात्रय दगडगावे, वैद्य प्रविण जोशी, वैद्य नरेंद्र गुजराती, वैद्य रामदास आव्हाड, तुळजापूर  डॉक्टर असोसिएशन, निमा तुळजापूरचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.  

यावेळी तुळजापूर शहरातून आयुर्वेद दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीचा समारोप वीर तपस्वी मठामध्ये होणार आहे. या ठिकाणी नागरीकांसाठी व्याख्यान होणार आहे. तसेच मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबीर होणार आहे. रुग्णांना सात दिवसांचे औषधे ही दिली जाणार आहेत. आयुर्वेदिक वैद्य, विद्यार्थी यांच्यासाठी व्याख्यान ही होणार आहे. या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन रथयात्रा समन्वयक वैद्य ऋतुराज कदम - पाटील, वैद्य गजानन कुलकर्णी, डॉ. मिलिंद कवठेकर, डॉ. विकास क्षीरसागर, डॉ. आनंद मेहता,  डॉ. किरण पवार, डॉ. राहुल पाटील, डॉ. कुतवळ मॅडम, डॉ.  जहागीरदार मॅडम, डॉ. प्रशांत मोटे यांनी यांनी केले आहे.

 
Top