उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वरी हस्तलिखित करणाऱ्यांचा मेळावा  शामराव दहिटणकर यांच्या सत्संग हॉल मध्ये संपन्न झाला ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पुणे पिंपरी - चिंचवडचे ह .भ.प .दत्ताभाऊ चिंचवडे ह .भ. प .गोकुळ तात्या घाडगे सौ मंगला सराफ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली या कार्यक्रमासाठी धाराशिव शहर व परिसरातील ३००पेक्षा जास्त भाविकांनी माऊलीच्या २७५ व्या समाधी सोहळ्यानिमित्त आपल्या हस्ताक्षरात ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून काढला त्यांचा एकत्रित कार्यक्रम संपन्न झाला. 

यावेळी बोलताना श्री शामराव दहिटणकर म्हणाले गीता ज्ञानेश्वरी यांना ग्रंथ श्रेष्ठ असे म्हणतात अशा आध्यात्मिक ग्रंथाचे स्वतःच्या हस्ताक्षरात लेखन करणे हे परमभाग्याचे लक्षण आहे या लेखनामुळे काही वाचिक मानसिक सर्व तपे साहजिक घडतात आपल्याला अध्यात्माची गोडी लागून आपल्याला जीवन साफल्याची व शांतीची अनुभूती येते पिंपरी चिंचवडचे ह भ प दत्ताभाऊ चिंचवडे यांनी महाराष्ट्रात व जेथे जेथे मराठी बोलतात अशा ठिकाणी ज्ञानेश्वरीचा प्रचार करण्यासाठी २३हजार ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी व वह्यांचे वाटप अत्यंत अल्प किमतीत केलेले आहे एक लाख ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठीच्या वह्या वितरण करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे कार्यक्रमासाठी बहुसंख्येने महिला- पुरुष उपस्थित होते ज्यांनी वह्या लिहून आणल्या होत्या त्यांचे विधिवत पूजन  केले या कार्यक्रमास शहरातील राम कृष्ण हरी सत्संग मंडळाचे सचिव अनंत व्यास , आर .एस .कुलकर्णी डी .व्ही. कुलकर्णी बापू पत्की, राजाभाऊ लोहार ,प्रदीप रोहडा बंडोपंत प्रयाग झरे गावचे ह .भ .प .काका महाराज  उपस्थित होते . त्याचबरोबर ज्ञानेश्वरी हस्तलिखित करणाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये श्रीमती उषा कुलकर्णी भूम सौ मंगल प्रयाग सौ माधुरी सुरू सौ रेणुका देशमुख श्री कुमार व्यास अंजली देशपांडे इत्यादींनी आपली मनोगत व्यक्त केली त्यामध्ये व्यक्त करताना म्हणाल्या आम्ही लिहीत बसल्यानंतर आमची मुले आमच्याबरोबर अभ्यास करू लागली आम्हाला प्रत्यक्ष माऊलीच लिहिताना मदत करत असते याचीही प्रचिती आली काहीजणांनी शाळा सोडून २५ ते ३०वर्षानंतर लेखणी हातात घेऊन लिखाण केले याचे अप्रतिम अनुभव व्यक्त केले.

 
Top