उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी येथे आज मनरेगा अंतर्गत तुती लागवड, फळबाग लागवड आणि हर घर नर्सरी अभियान राबविणे तसेच त्याअनुषंगाने कामे नियोजित कालावधीत सुरू करण्याबाबत विशेष ग्रामसभा घेण्यात आली.                         

  ग्रामसभेत ग्रामस्थांना तुती लागवड, फळबाग लागवड आणि हर घर नर्सरी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

 यावेळी मंडळ अधिकारी दत्ता कोळी, तालुका समन्वयक प्रविण गडदे, तलाठी बालाजी लाकाळ, कृषी सहाय्यक मनीषा काळे, ग्रामसेवक नवनाथ भोईटे यांच्यासह ग्रामस्थ तसेच शेतकरी व पत्रकार आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 
Top