उस्मानाबाद (प्रतिनिधी) 

      प्रकृती सुदृढ ठेवणे हे आपल्या हातात असून वेळोवेळी त्याची तपासणी केली तरच प्रकृती सुदृढ होईल, आणी प्रकृती सुदृढ झाली की,कुटुंब, गाव,आणी समाज देखील सुदृढ होईल असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. ते परांडा येथील न भुतो न भविष्यती अशा महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 

    कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव सावंत,डाॅ.धर्मेंद्र कुमार, डाॅ.मनोज अग्नेय यांची प्रमुख उपस्थिती होती. 

  यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना मंत्री सावंत म्हणाले की परांडा येथे भरविण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिरात लाखो महिला पुरूषांची मोफत तपासणी होत आहे. ही फक्त तपासणी नाही तर यातून काही गंभीर आजार आढळून आले तर त्या रूग्यांवर मोफत पुढील उपचार करण्यात येणार आहेत. यापूर्वीच आपण राज्यातील चार कोटी पेक्षा जास्त माताभगिनींची मोफत तपासणी केली आहे. यात कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यासारख्या आजारावर पुढिल उपचार सुरू होणार आहे, शिवाय ज्यांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशा महिलांवत शस्त्रक्रिया देखील करणार आहोत. परांडा येथे भरविलेल्या या महाआरोग्य शिबिरात आफण दोन दिवसात तज्ञ डॉक्टर्सच्या माध्यमातून तपासणी, चाचण्या, औषधोपचार, तसेच पुढिल शस्त्रक्रिया याचे नियोजन हे मागील दोन महिन्या पासून करण्यात आले आहे. गावोगावी जाऊन घरोघरी फिरून बेसलाईन सर्वेक्षणात आपल्याला रूग्ण आढळून आलेले आहे. या रूग्णांना व्याधीमुक्त करण्याचा आपला संकल्प असून हा जिल्हा सुदृढ करण्याचा आपला मानस आहे. जिल्हाच सुदृढ झाला तर जिल्हा सामाजिकदृषट्या सुदृढ होईल. सुदृढ समाज हे चांगाल्या व्यवस्थेचे प्रतिक आहे. या सुदृढ समाजासाठी आपण पुढेही अशाच पध्दतीने काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

    डाॅ. मनोज अग्नेय यांनी आपल्या भाषणातून महाआरोग्य शिबिरासाठी आलेल्या रूग्णांना पाहून आपणासाठी आम्ही इतक्या दूर आलो आहोत, आपली तपासणी हे माझे सर्वप्रथम प्राधान्यक्रम असणार असून आलेल्या प्रत्येक रूग्णांची तपासणी त्यांच्या विविध आजारावर औषधोपचार हे माझ्या सोबत आलेले  स्पेशालिस्ट डॉक्टर्स करतील आणी आपल्या आजाराचे निदान करून उपचार करतील. ही एक मोठी संधी असून एरवी महिनोमहिने आमची वेळ घ्याण्यासाठी थांबाव लागते मात्र इथं आम्ही आपल्यासाठीच आरोग्य मंत्री सावंत साहेब यांच्या विनंतीस मान देऊन आलो आहोत. याचा आपण सर्वांनी देखील लाभ घ्यावा असे आवाहन ही केले. 

   प्रा.शिवाजीराव सावंत यांनी या महाआरोग्य शिबिराचे नियोजन अत्यंत सुक्ष्म पद्धतीने केल्याने शिबिरास न भुतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला. सकाळी आठ वाजल्यापासून शिबिरास सुरूवात झाली.

 
Top