उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व त्यांना देण्यात येणारा लाभ वाटप करण्यात यावा. तसेच कामगारांना वेठीस धरुन त्यांचा मानसिक व आर्थिक छळ थांबविण्यात व मध्यान्ह भोजनमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात, यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्यावतीने एका निवेदनाद्वारे  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे दि.२९ नोव्हेंबर रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी एप्रिल २०२० मध्ये नोंदणी व नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. परंतू सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी हे अर्ज निकाली न काढता विनाकारण त्रुट्या टाकत आहेत. सर्व त्रुट्या एकदम न टाकता दरवेळी नवीन त्रुटी टाकली जाते. नियमात नसतानासुध्दा अनेक स्वयंघोषित नियम कामगारावर लादले जात आहेत. दर महिन्याला नवीन नियम लावत आहेत. अर्ज तपासताना नामंजुर कसा होईल ? हे पाहिले जाते. त्यामुळे कामगारांचा वेळ व पैसा वाया जात आहेत. तसेच मध्यान्ह भोजनमधील अनेक ठेकेदार व लाभार्थी बोगस आहेत. बऱ्याचशा साईड बंद असून सुध्दा जेवण दिल्याचे दाखवले जात आहे.  कामगारमंत्र्यांनी सांगून सुध्दा अधिकारी काम करत नाहीत. तसेच आपणाला देखील पालकमंत्र्यांनी सूचना केली असून आपल्याकडूनही कुठलाच प्रतिसाद नाही. फक्त जवळ असलेल्या लोकांचीच कामे होतात.  आम्ही वारंवार निवेदन देऊन सुध्दा कसलीही कारवाई होत नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसांत संबंधित कार्यालयाने कामात सुधारणा नाही केली नाही व कामगारांना योग्य न्याय न दिल्यास दि.१२ डिसेंबर रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयासमोर कामगारांसोबत उपोषण करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे. यावर प्रदेश सचिव आनंद भालेराव, जिल्हा संघटक पुष्पकांत माळाळे, मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे, उस्मानाबाद शहराध्यक्ष मेसा जानराव, रमेश घरबुडवे, नागनाथ जोगदंड, नेताजी शिंदे, समाधान सरवदे यांच्या सह्या आहेत.


 
Top