उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 बजाज आलायन्स विमा कंपनीला उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दणका दिला आहे. बजाज अलायन्स विमा कंपनीचे पुणे येथील सिटी बँकेत असलेले खाते गोठविण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनी विरोधात अशी ठोस कारवाई करण्याची ही पहिली वेळ असून यामुळे विमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

 विमा कंपनीचे सिटी बँकेत असलेले खात्यातील 374 कोटी रुपये जिल्हाधिकारी उस्मानाबाद या खात्यावर वळते करण्याचे आदेश दिले आहेत. खरीप 2021 च्या सोयाबीन पीक विमा नुकसानीपोटी 748 कोटी पैकी 374 कोटी रुप्ये न दिल्याने खाते गोठविण्याचे आदेश दिले आहेत, उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 65 हजार शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 65 हजार शेतकऱ्यांनी 2021 चा सोयाबीन या पिकाचा बजाज अलायन्स विमा कंपनीकडे विमा भरला होता त्यांना 7 कोटी 48 लाख विमा मिळणे अपेक्षित होते मात्र त्यांना 374 कोटी देण्यात आले उर्वरित 50 % रक्कम विमा कंपनीने दिली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी कठोर पावले उचलली आहेत.या रकमेच्या वसुलीसाठी त्यांनी कलम 180 नुसार कारवाई केली आहे.  बँकेचे खाते गोठविण्याचे आदेश दिले असून या खात्यावरून इतर खात्यावर रकमा जाणार नाहीत अश्या पद्धतीने खाते गोठविले आहे त्यामुळे ही विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


 
Top