उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 काँग्रेसचे युवा नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो पदयात्रेत काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद यांच्या नेतृत्वात सुफी पंथीयांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवत खा. गांधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार गांधी यांनी,भारतात शांतता सद्भभाव व बंधुभाव प्रस्थापित करण्यात सुफी संतांचे मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त केले. 

 सध्या देशभरातून जात असलेल्या भारत जोडो यात्रेत सुफी पंथातील नेत्यांच्या शिष्टमंडळाने खलील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली खासदार गांधी यांची भेट घेतली. यावेळी खलील सय्यद यांनी राहुल गांधीं यांचा टोपी, पारंपरिक रुमाल व जपमाळ व उस्मानाबाद येथील प्रसिद्ध दर्गा हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाझी   दर्गाहचा फोटो व मोहम्मद पैगंबर यांचे जीवनचरित्र पुस्तक भेट देऊन सत्कार केला.

 यावेळी उस्मानाबाद येथील मौलाना जाफर आली खान, खारी कलीमोद्दीन शेख, सय्यद हुसेन कैसर, तशकील सय्यद, मोहंमद शाफाईन उपस्थित होते.


 
Top