तुळजापूर / प्रतिनिधी-

जिलाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही तो डावलुन अनुदान कर्ज खाते जमा करुन घेतले व आता संपुर्ण कर्ज खाते रक्कम भरुन घेवुन देखील कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे . तरी या प्रकरणी  वैयक्तीक लक्ष देवुन   न्याय दयावा अशी मागणी कुंभारी येथील शेतकरी संजय कापसे यांना जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन देवुन केली

 मोजे कुंभारी (ता.तुळजापूर) येथील रहिवाशी असुन माझ्या उपजिवीका ही शेतीवर अवलंबुन आहे . सततच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे . शासना मार्फत मिळणारे अनुदान कॅनरा बँकेचे मॅनेजर तुळजापुर यांनी   कर्जाखात्यात जमा करून अनुदान दिले नाही . उलट   त्या कर्ज खात्यात राहिलेली रक्कम भरुन घे म्हणुन सांगितले   व नंतर कर्ज नवीन जुन करुन दोन दिवसात संपुर्ण रक्कम देतो असे आश्वातीत केले. त्यानंतर   सदरील रक्कम कर्ज खात्यात भरुन कर्ज खाते नवीन जुने केले तरी देखील सदरील अनुदान व कर्जाची रक्कम देण्यास कॅनरा बँक तुळजापूर चे मॅनेजर रक्कम  देण्यास टाळाटाळ करीत आहेत .  या प्रकरणी वैयक्तीक लक्षदेवुन मला न्याय दयावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

 
Top