तेर/ प्रतिनिधी-

  उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांची पालखी कार्तिक सोहळ्यासाठी पंढरपूरला प्रस्थान झालेल्या पालखीचे तेर येथे १८ नोव्हेंबरला सायंकाळी आगमन झाले..श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे स्वागत तेर येथे ग्रामसेवा संघाच्या वतीने  भव्यदिव्य दिपोत्सवाने करण्यात  आले.                               उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे ३ नोव्हेंबरला तेरहून प्रस्थान झाले.हि   पालखी सोहळा दि. २६आँक्टोबर  हिंगळजवाडी , दि. २७  रोजी उस्मानाबाद शहरात दाखल होत असून , दि. २८ भातंबरे येथील मुक्कामानंतर ,  दि.२९  रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे  29 आँक्टोबर रोजी  वैराग , दि.३० यावली , दि.३१ खैराव , दि.१ नोव्हेंबर रोजी अनगर , दि.२ रोपळे   या गावी मुक्काम करून गुरुवार दि.३  नोव्हेंबर रोजी  पहाटे हा पालखी सोहळा पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तिरावर   दाखल झाला.४  नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्या नंतर पंढरपूरातील पाच दिवसांच्या मुक्काम संपवून मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी तेरच्या दिशेने पालखी निघाली .परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊन येवती , खंडोबाचीवाडी  , कुंभेज , कापसेवाडी , काळेगाव , साकत , पिंपरी , कौडगाव , सांजा , काजळा मार्गे शुक्रवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी गोरोबा काकां याच्या पायी पालखी सोहळ्याचे तेर नगरीत सायंकाळी आगमन झाले. .श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे तेर येथील ग्रामसेवा संघाच्या वतीने भव्यदिव्य दिपोत्सवाने स्वागत करण्यात आले.दिपोत्सवाचा शुभारंभ नवनाथ पांचाळ  यांच्या हस्ते करण्यात आला.दिपोत्सव साजरा करण्यासाठी बालाजी भक्ते, तानाजी पिंपळे, केशव सलगर, नवनाथ पांचाळ, माधव मगर, गोपाळ थोडसरे, विलास टेळे, सारंग पिंपळे, विजयसिंह फंड, राजाभाऊ थोडसरे, नरहरी बडवे, भगवंत सौदागर, सुप्रिया चव्हाण, रूपाली पांचाळ, रत्नमाला पिंपळे व भाविकभक्तांनी  यांनी परीश्रम घेतले.. पालखीच्या दर्शनासाठी तेर व पंचक्रोशीतील हजारो भाविकभक्त आले होते.तेरकरानी आपापल्या दारासमोर सडा टाकून, विद्युत रोषणाई करुन,  रांगोळी काढली होती.


 
Top