तुळजापुर/ प्रतिनिधी- 

श्रीतुळजाभवानी मंदीरा लगत आरादवाडीकडे  जाणाऱ्या रोडवर मोठ्या प्रमाणात टाकलेल्या कच-यामुळे  घाणीचे साम्राज्य पसरल्याने भाविकांनसह नागरिकांना याचा ञास होत असल्याने  सदरील घाणीचे साम्राज्य दूर करण्याची मागणी भाविक व आरादवाडी भागातील रहिवाशांन मधुन केली जात आहे.

नगरपरिषद अधिपत्याखाली असलेल्या सध्या या रस्त्यावर  कचरा मोठ्या प्रमाणात  पडला आहे.तसेच देवीच्या जीर्ण झालेल्या परड्या ही पडल्या असल्याने भाविकांचा धार्मिक भावनेला ठेच पोहचत आहे. मंदीरा लगत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असताना निर्ढावलेले नगरपरिषद अधिकारी लक्ष देत नसल्याने याचा ञास नाहक नागरीक व भाविकांना सहन करावा लागत आहे तरी या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 


 
Top