उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मानसिक आजारबददल गैरसमज न बाळगता त्यावर वेळीच उपचार केल्यास ते आपण आटोक्यात आणू शकतो. तसेच आपल्या समाजाध्ये मानसिक आजाराविषयी असणा-या अंधश्रध्दा ही भरपूर आहेत. दिवसेंदिवस समाजात मानसिक आजाराचे रुग्ण हे वाढताना दिसत आहेत, तेव्हा अशा कार्यक्रामाच्या माध्यमातून मानसिक आजाराबाबत समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि सप्ताहाच्या उदघाटन प्रसंगी केले.

 या प्रसंगी प्रास्ताविकात मनोविकार तज्ञ डॉ. महेश कानडे म्हणाले की, 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. *“सर्वांसाठी मानसिक आरोग्य आणि कल्याण-प्राथमिकता तुमची आमची, नव्हे तर सर्वांची”* या घोष वाक्याविषयी माहिती देऊन दि. 10 ते 17 ऑक्टोबर या सप्ताहामध्ये साजरा करण्यात येणा़ऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 या जनजागरण रॅलीसाठी शहरातील शासकीय नर्सिग स्कूल, के.टी.पाटील कॉलेज अँड नर्सिंग स्कूल, इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल, आस्था नर्सिंग स्कूल, डॉ. शिवाजीराव घोगरे नर्सिंग स्कूल, बील गेटस्‍ नर्सिंग स्कूल, सहयाद्री नर्सिंग स्कूल अशा विविध नर्सिंग स्कूलनी या रॅलीमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवला. या वेळी के. टी. पाटील कॉलेज अँन्ड नर्सिंग स्कूलच्या विदयार्थ्यांनी मानसिक आराजाविषयी जनजागृती करणारे एक सुंदर असे पथनाट्य सादर केले.

 या जनजागरण रॅलीचा शुभारंभ जिल्हा शल्यकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. सचिन देशमुख, मनोविकार तज्ञ डॉ.राजेश नरवाडे, डॉ. सचिन गायकवाड, अधिसेविका सुमित्रा गोरे, सहाय्यक अधिसेविका राजश्री जाधव, रुग्णालयातील सर्व इंचार्ज, डापकू विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महादेव शिनगारे तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, व्यसनमुक्ती केंद्र, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आणि जिल्हा शासकीय महाविदयालय तसेच रुग्णायातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले.


 
Top