उस्मानाबाद  /प्रतिनिधी-  

नवीन शैक्षणीक धोरण हे विद्यार्थ्यांना केंद्रीत करून आखले गेले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महाविद्यालयातून देण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात धोरणात्मक बदल झाला आहे. विज्ञान शाखेच्या िवद्यार्थ्यांना परिक्षेत मराठीतून ही उत्तर लिहीण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या धोरणात विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासले जाईल, भाषा नाही, या प्रकारची माहिती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

उस्मानाबादेतील रा.प. महाविद्यालयात नवे शैक्षणीक धोरण या संदर्भातील प्राचार्यांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यानिमत्ताने डॉ. येवले आले होते. अधिक माहिती देताना डॅ. येवले यांनी यापुढे कला  , वाणिज्य  ,   विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेचे विषय घेता येईल, असे सांगितले.  पहिले वर्ष पुर्ण झाले तर प्रमाणपत्र, दुसरे वर्ष पुर्ण झाले तर पदवीका व तीसरे वर्ष पुर्ण झाले तर पदवी देण्यात येईल.  नव्या धोरणानुसार कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम ही महाविद्यालयात सुरू करण्यासंदर्भात परवानगी असेल.  नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासाठी स्कील बेस कोर्सेस सुरू करण्यास ही परवानगी देण्यात आली आहे. महाविद्यालयास निकष पुर्ण कर असेल तर त्या महाविद्यालयास स्वंयत्ता ही देण्यात येईल.

गडकरी व पवार यांना डीलिट देणार

डॉ.बाबासाहब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नोंव्हेंबर मध्ये होणाऱ्या दिक्षांत समारंभ कार्यक्रमात डिलिट पदवी देणार असल्याचे ही डाॅ.येवले यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत प्र.कुलगुरू डॉ.शाम क्षिरसाट, रा.प.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉ.दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते. 

संत साहित्याचा अभ्यास सुरू करणार

उस्मानाबादेत येथे संत साहित्याचा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती प्राचार्य जयसिंगराव देशमुख यांनी देऊन सध्या रिसर्च सेंटर कला, वाणिज्य, विज्ञान पदवीत्तर शिक्षण सुरू आहे. रा.प. महाविद्यालय लवकरच स्वांयत्ता महाविद्यालय होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. शिंदे, प्रा. जगताप आदी उपस्थिती होते. 

 
Top