उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महसूल अधिनियमन १९६६ चे कलम १७६ ते १८६ व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ महसूली प्रमाणपत्र नियम १७ अन्वये बजाज अलाइन्स कडील रक्कम वसूल कण्यासाठी पुणे िजल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

गेल्या सहा दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी २०२० चा पीकविमा मिळावा, अतिवृष्टीमुळे सरकार ने जाहीर केलेली नुकसान रक्कम मिळावी या मागणीसाठी अमरण उपोषण चालु केले आहे. या आंदोलन दरम्यान गेल्या कांही दिवसापासून रस्तारोको, जलसमाधी घेणे, जिल्हाधिकारी कार्यालयावर चढणे, मंुडण करने, बसवर दगडफेक आदी घटना घडल्या. यावेळी  पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभाग कडक पाऊले उचलत आहे. एसटी बस तोडफोड व इतर प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे सांगून शांततेचा भंग केल्यास कडक कारवाई करू, असे सांगितले. जिल्हाधिकारी डाॅ.ओम्बासे यांनी सर्वोच्च न्यायालयात जमा असलेले २०० कोटी रुपये उस्मानाबाद येथील कोषागार कार्यालयात जमा झाले असून सोमवार पासून त्याचे वितरण करण्यात येईल, असे सांगितले. सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकुण २७४ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे शासनाला कळविले असून, ही नुकसान भरपाई लवकरच प्राप्त हुईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी अामदार कैलास पाटील यांना आवाहन करताना  ही कायदेशीर लडाई असल्यामुळे आपले अमरण उपोषण परत घ्यावे, असे आवाहन केले. बजाज अलाईन्स या विमा कंपनीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकारी उद्या दिल्लीला जात असून न्यायालयीन प्रक्रिया त्यांना करण्यास सांगितल्या आहेत.


 
Top