तुळजापूर / प्रतिनिधी- 

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष   राज ठाकरे यांचे सुपूत्र, मनसे नेते अमित ठाकरे हे उद्या दि . ६ व ७ ऑक्टोबर रोजी धाराशिव जिल्हा दौर्‍यावर येत असुन, दि. ७ रोजी तुळजापूर येथे जिल्हा मनसेच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमा नंतर, सायंकाळी ४ वाजता ते जळकोट ता. तुळजापूर येथे भेट देणार असुन, त्यांचे हस्ते जळकोट ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उद्‌घाटन व पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात येईल .

यामध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, तांडा वस्ती , दलित वस्ती सुधार योजनेतील कामांचा समावेश आहे .  या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी सरपंच आशोक  पाटील हे राहणार असुन ,  ग्रामपंचायतीच्या वतीने अमित ठाकरे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार  आहे . यानंतर ते प्रशांत नवगिरे यांच्या निवासस्थानी भेट देतील . या संपुर्ण कार्यक्रमांस जळकोट व पंचक्रोशीतील नागरीक व मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top