वाशी / प्रतिनिधी-

 २५ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या इंटर स्टेट लेवल चॅम्पीअनशीप मध्ये शाळेतील विद्यार्थी कु. स्वरा शैलेश साळुंके , साक्षी मच्छिंद्र येताळ, राज सचिन शिंदे, वेदिका संपत जगताप, शशांक गणेश सुकाळे यांनी यश संपादन केले.

   या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. शाळेचे संस्थापक श्री. एस.एल. पवार सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक करून पुढील परिक्षेस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top