उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आगामी निवडणुका एकट्याने लढणार आहोत असे सांगत, त्यांनी सोबत घेतले तर त्यांची मर्जी असे आमदार बच्चू कडू यांनी सांगत पुन्हा एकदा नाराजीचा सूर आवळला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका प्रहार पक्ष एकटा लढणार असून जर शिंदे गट व भाजपने त्यांची मर्जी असेल त्यांनी सोबत घेतले तर ठीक नाही तर आम्ही स्वतंत्र लढू असे सांगत प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नाराजी नाराजीचा सूर आवळला आहे.

 बच्चू कडू हे आज उस्मानाबाद जिल्ह्यात कोर्टाच्या तारखेसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मंत्रीमंडळ विस्तारबाबत सांगणे कठीण आहे, ते इतके सोपे नाही, अजून 15 -20 जणांना मंत्री करायचे आहे वेगळी नीती आसू शकते असे ते म्हणाले. मंत्री मंडळाच्या विस्तारात मी असेल पन मंत्री पद नाही दिले तर बचू कडू आहे. चांगल होण्यासाठी वेळ लागतो असे सांगत त्यांनी मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली व दिव्यांग मंत्री होण्यास आवडेल असे म्हणाले.


 
Top