तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर शहरातील हद्द वाढ भागातील समर्थ नगर शिंदे प्लाटींग येथील मेन रोड वर मागील चार पाच महिन्यांपासून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे.

 या त्रासाला कंटाळून या भागातील महिलांनी  या रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे जलपूजन केले तसेच सुवासिनींनी  हळदी कुंकू समारंभ आयोजित करून महिलांनी या भागात साखर वाटप केली या मध्ये प्राजक्ता कुलकर्णी, रोहिणी कुलकर्णी, ज्योती साबळे, महानंदा साबळे, गोदावरी जाधव, स्नेहल पवार, विजया कमठाणकर, मुक्ताबाई पाचांळ या महिलांनी सहभाग घेतला. 


 
Top