उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खडकी येथे विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यु झालेल्या भंडारे पिता-पुत्राच्या कुटुंबियांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी  सांत्वन करून शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची दिली ग्वाही िदली. 

 खडकी ता.तुळजापूर येथे विजेचा धक्का लागून भंडारे कुटुंबातील पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी खडकी येथे भेट देवून भंडारे कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच तात्पुरती आवश्यक ती मदत करून धीर दिला. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना बोलून दुर्घटनेचा तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, राम जवान, शिवाजी साठे, बबन भंडारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top