उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तेरणा साखर कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करावा व तेरणा परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांची होणारी हेळसांड थांबवावी म्हणून माजी गृह, ऊर्जा व पाटबंधारे मंत्री डॉ  पद्मसिह पाटील यांच्या उपस्थितीत तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने आ. राणाजगजिसिंह पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे आमदार  राणाजगजितसिह पाटील यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडनवणीस यांच्या समोर तेरणा बचाव संघर्ष समिती सह, डीसीसी  ,21 शुगर व भेरवनाथ शुगर यांच्यात तडजोड मिटिंग करून अथवा विविध मार्गाने प्रयत्न करून तेरणा साखर कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करावा व तेरणा परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 या वेळी तेरणा परिसरातील शेतकरी व सभासद व  तेरणा बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 


 
Top