उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन विभाग या दोन विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजनेचे 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्याकरिता http://mahadbtmahait.gov.in हे संकेत स्थळ दि.22 सप्टेंबर पासून सुरु झाले आहे. त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

 कनिष्ठ महाविद्यालय अभ्यासक्रमास (उदा. अकरावी, बारावी, एम.सी.व्ही.सी. आय.टी.आय. इत्यादी) नवीन अर्ज प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन अग्रेशित करण्याकरिता मुदत दि. 08 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. तसेच नुतनीकरण अर्ज प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन अग्रेशित करण्याकरिता मुदत दि. 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे.

 वरिष्ठ महाविद्यालय बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास (कला, वाणिज्य, विज्ञान शाखा सर्व अभ्यासक्रम) नवीन अर्ज प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन अग्रेशित करण्याकरिता मुदत दि. 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. तसेच नुतनीकरण अर्ज प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन अग्रेशित करण्याकरिता मुदत दि. 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे.

 इतर सर्व व्यावसायिक महाविद्यालयास (उदा.अभियांत्रिकी, वैद्यकीय, तंत्रनिकेतन, व्यवस्थापन, फार्मसी आणि नर्सिंग आदी) नवीन अर्ज प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन अग्रेशित करण्याकरिता मुदत दि. 05 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. तसेच नुतनीकरण अर्ज प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन अग्रेशित करण्याकरिता मुदत दि. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे.

 जिल्ह्यातील सर्व अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तसेच पालकांना विहीत मुदतीमध्ये आपले शिष्यवृत्तीचे अर्ज http://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावरती भरुन ते ऑनलाईन पध्दतीने आणि ऑफलाईन पध्दतीने आपल्या विद्यालयाकडे जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.

 त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या संबंधित शैक्षणिक विभाग, सक्षम यंत्रणा (उदा.संचालनालय उच्च शिक्षण संचालनालय तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र परिचर्या, कृषी तंत्र शिक्षण, राज्य शासनाची शुल्क नियामक प्राधिकरणे आदी) यांच्याशी तात्काळ समन्वय साधून शैक्षणिक शुल्क आणि परिक्षा शुल्कास मंजूरी घेऊन शिष्यवृत्तीचे अर्ज तपासणी करुन तात्काळ समाज कल्याण कार्यालयाकडे अग्रेशित करावेत.

 आपल्या महाविद्यालयात प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. विहीत मुदतीत अर्ज सादर न केल्यास आणि त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाहीत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री.अरवत यांनी केले आहे.


 
Top