उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तालुक्यातील सारोळा( बुद्रुक) येथे राजे छत्रपती सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने सारोळ्याचा महाराजा मंडळाच्या श्री गणरायांची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली.
सारोळा( बुद्रुक )येथे राजे छत्रपती सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने सारोळ्याचा महाराजा नावाने आराध्य दैवत श्री गणराया अर्थात लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते .कोरोना महामारी व लाँकडाऊनमुळे मागील दोन वर्ष ही परंपरा खंडित झाली होती .आता निबंर्ध उठल्याने पुन्हा एकदा सारोळा येथे सारोळ्याचा महाराजा गणरायाची प्रतिष्ठापना भाजपाचे ज्येष्ठ नेते ,माजी पं. स. सदस्य सुरेश भाऊ देवगिरे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी तेरणा साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश रणदिवे, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरपंच प्रशांत रणदिवे, राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे, बालाजी कापसे, नामदेव खरे ,सागर रणदिवे, मुन्ना रणदिवे ,दत्ता रणदिवे ,हभप महादेव महाराज ,पप्पू रणदिवे आदी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रति वर्षाप्रमाणे यावषीर्ही चारोळ्याचा महाराजा मंडळाच्या वतीने श्री गणरायाची भव्य दिव्य मूर्ती ,मोठा मंडप, विद्युत रोषणाई आणि प्रवेशद्वार किल्ल्याच्या आकारामध्ये साकारले आहे.