उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर अंतर्गत बाल संस्कार व युवा प्रबोधन विभाग आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने उस्मानाबाद शहरातील समतानगर येथील परिमल मंगल कार्यालयात शनिवार, १ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता बाल संस्कार व युवा प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात गुरूपुत्र नितीनभाऊ मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत.

 श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरूपीठाच्या वतीने गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक कोटी महावृक्षारोपण व संवर्धन अभियान आणि ग्राम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बालसंस्कार मेळाव्याच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धन, ग्रामविकास तसेच वैज्ञानिक कसोटीवरील आध्यात्माचे मार्गदर्शन करण्यात येते. उस्मानाबाद येथे शनिवारी होणाऱ्या बालसंस्कार व युवा प्रबोधन मेळाव्यात नितीनभाऊ मोरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील सेवेकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समर्थनगर येथील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top