उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील वाकरवाडी येथील शिवसेनेच्या (ठाकरे) गटाच्या  सरपंच सौ. उज्वलाताई बंडू ढवारे यांनी भाजप नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या  नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. सरपंच पती श्री. बंडू विठ्ठल ढवारे यांनीही भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.

 सदरील प्रवेशासाठी भाजपा तालुका उपाध्यक्ष  रमोद देशमुख यांनी पुढाकार घेतला. वाकरवाडीचे भाजप नेते लालासाहेब शिंदे, उपसरपंच गणेश रामभाऊ पवार, ग्रा. प. सदस्य विजयकुमार शिंदे, महादेव शिंदे, विकास पवार, ज्ञानेश्वर शिंदे, अमर शिंदे, अण्णा ढवारे आदी उपस्थित होते. ढोकी जि. प.गटात वाकरवाडी हे गाव सेना खासदार व आमदार यांचं गड समजला जात होता. भाजपने या गडातच सुरुंग लावत सेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान ढोकी जि. प.गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांचा सत्कार केला.

 यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनंतराव देशमुख, झुंबर बोडके, जेष्ठ नेते गोविंदभाऊ तिवारी, जेष्ठ नेते सतिश देशमुख, तालुका उपाध्यक्ष प्रमोद देशमुख, बारीसाहेब काझी, एजाज काझी, विलास रसाळ, किशोर परीट, प्रभाकर गाढवे, काका पाटील, संजय घनघावे, विश्वजित लंगडे, शाहजी कांबळे, जावेद सय्यद, पवन वाघमोडे, शिव सुरवसे, भाऊसाहेब गरड, इनायत काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top