तेर / प्रतिनिधी    

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामसेवा संघास  सेवाभावी कार्यामुळे  गुंज सेवाभावी संस्थांच्या वतीने गुंज सेवाभावी संस्थाचे मराठवाडा प्रमुख अजित कांकरीया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.                                         

 यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी,श्री. संत गोरोबा काका दुध संस्थेचे माजी चेअरमन पद्माकर फंड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन कोठावळे,तेर स़ोसायटीचे माजी चेअरमन व्यंकटराव माळी,आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक नंदकिशोर तांबडे ,अॅड. बालाजी भक्ते, नवनाथ पांचाळ, तानाजी पिंपळे,विलास टेळे, केशव सलगर, माधव मगर, नरहरी बडवे,समीर बनसोडे, सारंग पिंपळे, भगवंत सौदागर,सागर भक्ते, रविंद्र शेळके, गोपाळ थोडसरे, विजयसिंह फंड,नामदेव गायके, राजेंद्र थोडसरे, प्रविण बंडे, रामेश्वर दुधाळ,शाम आंधळे उपस्थित होते.


 
Top