उस्मानाबाद /प्रतिनिधी -

तालुक्यातील चिखली येथील शिवगुरू नगर येथील श्री दत्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ३ ते ९ ऑगस्ट या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हभप नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या हस्ते व  हभप तानाजी जाधव यांच्या उपस्थितीत कलशपुजन करून सप्ताह सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. सप्ताह सोहळ्यात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, स. ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, दु. १ ते ३ गाथा भजन, सायं. ४ ते ५ नामजप, ५ ते ६ हरिपाठ, सायं. ९ ते ११ कीर्तन, रा.११ नंतर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी (दि. ३) हभप अनंत पाटील महाराज, गुरूवारी (दि. ४) हभप फुलचंद गाडे, शुक्रवारी (दि.५) हभप धनराज पाटील, शनिवारी (दि.६) हभप भवन माडजे,  रविवारी (दि.७) हभप नवनाथ महाराज, सोमवारी (दि.८) लिंबराज चव्हाण महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे. याच दिवशी हभप रामकृष्ण मते महाराज यांचे प्रवचन होणार आहे. मंगळवारी (दि.९) हभप मुकूंद देवगिरे महाराज यांचे स. ९ ते ११ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून यानंतर महाप्रसाद वाटपाने या सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे .

 
Top