उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या प्रांगणामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . प्रशालेचे प्राचार्य श्रीयुत साहेबराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि भाजपचे राज्य कार्यकारी सदस्य श्री सुधीर उर्फ आण्णा केशवराव पाटील यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे पदी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ प्रेमा सुधीर पाटील होत्या या प्रसंगी  प्रशालेतील पाचवी ते बारावी चे 7189 विद्यार्थी मैदानावर उपस्थित होते .प्रशालेतील संगीत विभागाचे शिक्षक  पाटील सर व त्यांच्या विद्यार्थी चमूने देशभक्तीपर विविध गीते गायली. प्रशालेतील एन.सी.सी .विभागाचे प्रमुख श्री शेंडगे सर यांच्या नेतृत्वाखाली एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली . विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने ‘भारत माता की जय ‘ अशा घोषणा देऊन आसमंत दुमदुमून टाकला त्यामुळे एक देशभक्तीचे वातावरण सर्वत्र संचारले होते . याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री. गाडे सर , महेश शिंदे सर, प्रशालेचे उपमुख्याध्यापक   सिद्धेश्वर कोळी, उपप्राचार्य   संतोष घार्गे सर,पाचवी ते बारावी चे सर्व पदाधिकारी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top