उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री सिध्दीविनायक  मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.उस्मानाबाद च्या मुख्य कार्यालयात ७५  वा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम सकाळी ०८.००  वा संपन्न झाला. या प्रसंगी ध्वजारोहण व भारतमाता प्रतिमापूजन श्री सिध्दीविनायक  मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजकुमार जाधव  यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायनाने ७५  वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

  यावेळी संस्थेचे संचालक श्री.दाजीअप्पा पवार, श्री.अरविंद गोरे, श्री.नितीनजी हुंबे, श्री.योगेश कुलकर्णी, श्री.विकास सुत्रावे, नगरसेवक श्री.अभिजित काकडे, तसेच संस्थेचे सर्व महिला कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.


 
Top