उस्मानाबाद /प्रतिनिधी -

चोराखळी येथील धाराशिव शुगर कारखान्यावर आयकर विभागाची धाड पडली असून आज पहाटे पासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई सुरु आहे.ही कारवाई आगामी काही दिवस सुरु राहील अशी माहिती आहे.

अभिजीत पाटील चेअरमन असलेल्या कारखान्यावर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील असून ते साखर सम्राट म्हणून गेल्या 10 वर्षात ओळखले जात आहेत. विठ्ठल सहकारीसाखर कारखाना पंढरपुर धाराशिव साखर कारखानासह  5 कारखाने त्यांच्या नेतृत्वाखाली आहेत. कृषी अभ्यास शिबीर 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट असा बोर्ड लावून आयकर विभागाची गाडी धाराशिव साखर कारखाना येथे धाड टाकण्यासाठी आली आहे, या गाडीवर लागलेल्या बोर्डनुसार 30 ऑगस्ट पर्यंत हा आयकर विभागाचा अभ्यास दौरा सुरु राहणार आहे.5 गाड्यात जवळपास 20 च्या वर अधिकारी हे अभिजीत पाटील यांच्या विविध संस्थाची चौकशी करीत आहेत यात पुणे व दिल्ली येथील काही अधिकारी यांचा समावेश आहे.


 
Top