उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  उस्मानाबाद येथील श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी यशवंत सुनील ढगे याची किंग बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अमेझिंग ब्रिलियंन्स म्हणून नोंद झालेली आहे. 

यशवंत ढगे याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे ॲक्रॅलिक कॅनव्हास वर 10 बाय 7 आकाराची अतिसुंदर पेंटींग साकारली आहे. या त्याच्या अतुलनीय कामामुळे त्याची किंग बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये अमेझिंग ब्रिलियंट्स म्हणून निवड झालेली आहे.या जागतिक अशा पुरस्कारामुळे धाराशिव जिल्ह्य़ाची नोंद जागतिक पातळीवर झालेली आहे. त्यामुळेच शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव उस्मानाबाद यांचे तर्फे यशवंत ढगे यांचा आदर सत्कार करण्यात आला. नवनवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळावे,मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा,तरूण कलाकारांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने समितीने सुनील ढगे यांचे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन कौतुकपर अभिनंदन केले आहे.यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष श्री. शशिकांत खुने,सचिव श्री दत्तात्रेय साळुंके,सुनिल मिसाळ,दत्ता जावळे,नितीन फंड,ओमकार शितोळे,राजकुमार ढोबळे,धनंजय साळुंके,रमेश यादव,संजय डोंगरे,मनोज मोरे,इ.पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top